Diwali 2024 Date भारतीय संस्कृतीत सणाला फार महत्त्व देण्यात आलं आहे. या सणांमध्ये दिवाळी (Diwali 2024) हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा असा सण आहे जो देशभरात साजरा केला जातो. धनत्रयोदशी ते रक्षाबंधन अशा पाच दिवसांच्या या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. मात्र, यंदा दिवाळी नेमकी कधी याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. यासाठीच यंदाची दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते आपण जाऊन घेऊयात.
दिवाळी नेमकी कधी? (Diwali 2024 Date)
दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. मात्र, यंदा लोकांमध्ये या तारखेसंबंधित संभ्रम आहे. तर, हिंदू कॅलेंडरनुसरा, यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी पासून या सणाला सुरुवात होणार आहे. तर, 3 नोव्हेंबर म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी समापन होणार आहे.
धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात – 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून सुरु होईल. ते त्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र, दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजीच सुरु होणार आहे.